कोल्हापूर

कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयास एन.ए.बी.एच मानांकन प्राप्त

CD

यशवंत धर्मार्थ रुग्णालयास
एन.ए.बी.एच मानांकन

कोडोली : येथील यशवंत आयुर्वेदिक कॉलेज संलग्नित यशवंत धर्मार्थ रुग्णालयास एनएबीएच मानांकन मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील व प्राचार्य व रुग्णालय अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतीय गुणवत्ता परिषदेद्वारे रुग्णालयातील आयसीयू, सेमी आयसीयू, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटर, पंचकर्म, आत्याईक इत्यादी विभागातील सोयी-सुविधा तपासून भारतीय गुणवत्ता परिषद न्यू दिल्लीचे मानांकन मिळालेले दक्षिण महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील पहिले चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल असल्याचे त्यांनी सांगितले. या मानांकनामुळे रुग्णालयात कॅशलेस सुविधा, विविध सरकारी आरोग्य योजना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचे नॅशनल ॲक्रिडीटेशन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल कोच्चर यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले. याकामी संस्थेचे अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांचे मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी उप प्राचार्य डॉ एल. बी. पाटील, केंद्रीय चिकित्सा परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकिरण वाघ, एनएबीएच समन्वयक डॉ. हर्षल साबळे, एच.आर. अजिंक्य मोरे, पी.आर.ओ. संजय नलवडे, सागर पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT