कोल्हापूर

तरवे जगवण्यासाठी टँकरने पाणी : तरवे कोमेजले : पावसाकडे डोळे.

CD

04546
म्हसवेत : येथे पाऊस न झाल्याने टँकरद्वारे पाणी पाजून उगवण करण्यात शेतकरी गुंतला आहे. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा)

भात रोपांना टॅंकरद्वारे पाणी
कोनवडे परिसर; पिके जगविण्यासाठी धडपड
कोनवडे, ता. १६ : पावसाने ओढ दिल्याने यंदा मृग नक्षत्रासह रोहिणी नक्षत्रही कोरडे गेले. मृग नक्षत्र सुरू असूनही पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत आहे. पेरलेले भातपीक वाया जाऊ नये व उगवण झालेल्या सुकत चाललेली रोपे जगवण्यासाठी टँकरने विकत पाणी घेऊन रोप जगवण्यात शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. भात पेरणीस महिना ओलांडला तरीही पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.
कूर, दारवाड, महालवाडीसह भुदरगड तालुक्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करतो. पण पेरणी करून सव्वा महिना उलटला तरी उगवण न झाल्याने भात पीक वाया जाऊ नये यासाठी धडपडत आहे. नदी, विहीर, कालवा, टँकर यांच्या साहाय्याने भात पिकास पाणी देत आहे. वेदगंगा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे ठाकले आहे. माळरानावर पेरणी केली; पण उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट समोर आहे.
हेदवडे, गिरगाव, फये, देवकेवाडी, मोरस्करवाडी, आप्पाचीवाडी, पंडिवरे, मिणचे बुद्रुक, कोळवण, बोंगार्डेवाडी, भाटीवडेसह परिसरातील शेतकरी भातरोप लागण करतो. पण यंदा मृग नक्षत्रावर पाऊसच न झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. उगवण झालेली रोपे पावसाअभावी सुकू लागल्याने कोमेजणाऱ्या पिकांची माना टाकलेल्या पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. शेतकरी भात पिकांचे तरवे जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहे.
---
कोट :
पेरणी करून महिना उलटला तरी पाऊस न झाल्याने धूळवाफ पेरणीतील भात बियाणे खराब झाले आहेत. आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.
- राघव मोरे, शेतकरी, दारवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT