कोल्हापूर

पापड करण्यासाठी गृहिणींची लगबग : पावसाळ्यातील पदार्थांची तयारी.

CD

पापड करण्यासाठी गृहिणींची लगबग

कोनवडे, ता. १० : पावसाळ्यात रोजच्या आहारात लागणारे विविध पदार्थ महिला उन्हाळ्यात करून ठेवले जातात. पावसाळा जवळ येऊ लागल्याने पावसाळ्यात जेवणात लागणाऱ्या पापड, पापड्या, कुरडया, सांडगे आदी पदार्थ करण्यात ग्रामीण भागातील महिला गुंतल्या आहेत. त्यामुळे मिरची, डाळी, तांदूळ यांची मागणी वाढली आहे.
पावसाळा सुरू झाला की बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक मंदावते, त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात काय भाज्या करायच्या, हा प्रत्येक गृहिणींसमोर प्रश्न असतो. त्यामुळे या काळात पूर्वापार चालत आलेल्या पदार्थांना मागणी वाढते. त्यामुळे हे पदार्थ कडक उन्हाळ्यात तयार करून साठवून ठेवण्यात गृहिणी दंग आहेत. शहरी भागात विविध ठिकाणांहून भाजांची आवक होते. पण ग्रामीण भागात पावसाळ्यात या पदार्थांची रेलचेल असते. धो धो पावसात शेतात किंवा घरात या पदार्थांची चव जेवणाची लज्जत वाढवते. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. अशा तापमानात हे पदार्थ करून वाळवून ठेवले जात आहेत. यामुळे याचा वर्षभरासाठी उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT