05644
प्रगती परीट
.....
परिस्थिती हरली.. प्रगती जिंकली...
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २१ : वडिलांचे छत्र हरवलेले... आई मनोरुग्ण... स्वतःचे घर नाही... सोयी सुविधांपासून वंचित... अशा परिस्थितीवर मात करत मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील प्रगती धोंडिराम परीट हिने खासगी शिकवणीशिवाय कॉलेजला दहा किलोमीटर चालत जाऊन बारावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळविले. तिच्या यशाचे कौतुक होत आहे.
प्रगती ही मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील आर. व्ही. देसाई विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी. तिने ७३ टक्के मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या शिवम समाजभान परिवाराने प्रगतीला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तिच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, आई मनोरुग्ण आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने हे यश मिळविले. घर नसल्याने शिवम परिवाराने तिला घर बांधून दिले. शिवम परिवार, शिवम साधक सागर गुरव यांच्या प्रेरणेने यश मिळवल्याचे तिने सांगितले. पोलिस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. पुढच्या शिक्षणासाठी तिला गरज आहे ती समाजाच्या आर्थिक पाठबळाची.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.