कोल्हापूर

शेतकरी दाम्पत्याच्या मुलीचे ‘नीट’मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश

CD

5728
ऋतिका पाटील
......
शेतकरी दाम्पत्याच्या मुलीचे
‘नीट’मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश

कोनवडे, ता. ६ : घरची परिस्थिती बेताची. आई-वडील शेतकरी. अनंत अडचणी असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नाधवडे (ता. भुदरगड) येथील शेतमजूर कुटुंबातील ऋतिका रघुनाथ पाटील हिने पहिल्याच प्रयत्नात ‘नीट’ परीक्षेत ६२३ गुण मिळवत यश संपादन केले.
ऋतिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाधवडेत, तर अकरावी-बारावीचे शिक्षण मुदाळ येथील प. बा. पाटील सायन्स ॲकॅडमीमध्ये झाले. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती अविरत कष्ट घेत होती. सोमवारी (ता. ४) ‘नीट’चा निकाल जाहीर झाला. त्यात तिने पहिल्याच प्रयत्नात ६२३ गुण मिळवले. ऋतिकाचे वडील रघुनाथ पाटील व आई सविता पाटील अल्पशिक्षित आहेत. वडील मुंबईत हॉटेलमध्ये काम करत होते. मात्र, तेथील तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा खर्च भागणे अवघड बनल्याने त्यांनी गावी येऊन शेती तसेच ऊसतोडणीचे काम सुरू केले. मुलीच्या यशामुळे पाटील कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गरीब शेतकरी कुटुंबातील ऋतिकाने नीट परीक्षेत यश मिळवले; पण पुढच्या शिक्षणासाठी खर्च करणे जिकिरीचे असल्याने तिला गरज आहे ती समाजाच्या आर्थिक पाठबळाची.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT