कोल्हापूर

विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश जुन्या गणवेशावरच

CD

संग्रहित छायाचित्र वापरावे.
....
विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश जुन्या गणवेशावरच

शासनाकडून शाळांना कापड न मिळाल्याचा फटका

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १० : राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणार असून, समग्र शिक्षा अभियानाचा आदेश उशिरा आल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार आहे. शासनाकडून गणवेशासाठीचे कापड शाळांना मिळाले नसल्याने कमी वेळात गणवेश कसा पुरवावा, असा पेच शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडथळा आल्याने यंदा असा प्रकार घडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्काऊट व गाइडच्या विद्यार्थ्यांसारखा गणवेश पुरविला जाणार आहे. यांतील एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर, तर दुसरा स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिवून देण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचे कापड हाफ शर्टसाठी व फुल्ल पँटसाठी गडद निळ्या रंगाचे कापड असणार आहे. विद्यार्थिनींसाठी कमीजसाठी आकाशी निळे, तर सलवारीसाठी गडद निळे कापड गणवेशासाठी पुरविण्यात येईल. शाळा सुरू होण्यास पाच दिवस उरले आहेत. तरीही शासनाकडून गणवेशासाठीचे कापड शाळांना मिळाले नसल्याने चालू शैक्षणिक वर्षाचे नवीन गणवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना दोन ते तीन महिने वाट पहावी लागणार आहे.
...
चौकट :
शिलाईसाठी केवळ १०० रुपये
गणवेशाच्या शिलाईची रक्कम १०० रुपये ठरविण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरित केली जाईल. या समित्यांवर गणवेश तयार करून घेण्याची जबाबदारी आहे. इतक्या कमी रकमेत गणवेशाची शिलाई करून घेताना शाळाची दमछाक होणार आहे
...
चौकट :
नियोजनाअभावी संभ्रम
गणवेशासाठी आवश्यक कापड केव्हा, कधी व कोणत्या मापाने मिळणार याबाबतचे नियोजन शाळांपर्यंत जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने दिले नसल्याने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती संभ्रमावस्थेत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस जुन्याच गणवेशावर सुरू होणार आहे असे दिसते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT