कोनवडेत
एकरातील
उस जळाला
कोनवडे, ता. २९ : येथे दुपारी साडे तीनच्या वेल्डींग काम करत असताना ठिणगी पडून ऊस पिकाने पेट घेतला. यात सुमारे एकरातील उभा ऊस जळाला यात शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने शेकडो एकरातील ऊस वाचला.
गावाशेजारील खरी नावाच्या शेतात गोठ्याचे वेल्डींग काम सुरू होते. वेल्डींग काम करत असताना वेल्डिंगची ठिणगी अचानक उडून शेजारीच असणाऱ्या उभ्या ऊस पिकाने पेट घेतला आगीच्या ज्वाला उडाल्या व मोठा आवाज होऊ लागला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून एकत्र येत आग आटोक्यात आणली. आगीत कृष्णा रामा पाटील, महिपती रामा पाटील, जयसिंग रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान राखून तानाजी पाटील, शहाजी भोसले, अनिल पाटील, सुहास चव्हाण, सुनील पाटील, शंकर पाटील, दयानंद सुतार, अवधूत पाटील, संजय पाटील, रमेश पाटील, वैभव पाटील, अमोल पाटील यांनी अन्य शंभर एकरातील ऊस पीक वाचवले. या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधनाचे कौतुक होत आहे. ''बिद्री'' कारखान्याची अग्निशामक घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्यामुळे गाडीस परतावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.