06738
मक्का, ज्वारी, हत्तीगवत ठरतेय आधार
भुदरगड तालुका; वैरणीअभावी जनावरे सांभाळताना संघर्ष
सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २८ : भुदरगड तालुक्यातील कुर, मिणचे, हेदवडेसह जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना सध्या वैरणीची टंचाईचा सामना करावा लागत आहे. गळीत हंगाम संपल्याने पशुपालकांची दाहीदिशा झाली आहे. अडचणीच्या कालावधीत मक्का, ज्वारी, हत्ती गवत पीक शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणीसाठी आधार देणारे ठरले आहे. वैरणीअभावी शेतकऱ्यांच्या खंडित होणाऱ्या दूध व्यवसायास मक्का, ज्वारी, हत्ती गवत यामुळे गती मिळत आहे. जिल्ह्यात सातशे हेक्टरवर मक्का पीक आहे.
गळीत हंगाम संपल्याने शेतकऱ्यांना वैरणीची टंचाई जाणवू लागली आहे. याचा विचार करुन सुरुवातीलाच ऊसाच्या पिकातून शेतकऱ्यांनी मका पीक घेतले आहे. त्यामुळे एकीकडे मक्याचे उत्पादन व दुसरीकडे मक्याची वैरण म्हणून वापर होताना दिसत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या परिसरातील ८० टक्के पेक्षा जास्त शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. काही अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन कमी आणि जनावरे जास्त अशा शेतकऱ्यांकडे वैरण नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. परिणामी सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडले आहे. सुक्या वैरणीचे दरही गगनाला भिडले आहेत. शिवाय सुका चारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे वैरणीची टंचाई येईल या धारणेने शेतातील खोडवा व लावणीत केलेले मका
पीक उपयोगी ठरत आहे. दूध उत्पादनासाठी मका पोषकच असल्याचे सिध्द झाले आहे. ओल्या वैरणीमध्ये कणसासह वापरलेला मका दुभत्या जनावरांसाठी पोषक असतो. त्यामुळेच शेतकरी पशुखाद्य म्हणून मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
---
चौकट :
मक्यासाठी गुंठ्याला दीड हजार
कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर मार्च ते जूनपर्यंत जिल्ह्यात ओल्या वैरणीची टंचाई असते. या कालावधीत पशुपालक स्वतः चारा करतातच; त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांकडून कणसासह विकत घेतात. त्याचा दर गुंठ्याला हजारापासून दीड हजारापर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.