कोल्हापूर

आकुर्डेतील अपघातप्रवण ठिकाणी थर्मोप्लास्टिकची मागणी : बसस्थानक, दत्त मंदिर परिसरात सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात : नाथाजी पाटील.

CD

09005
रस्त्यावर सुरक्षा उपायांची
आकुर्डेमध्ये मागणी
गारगोटी, ता. ७ : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील बसस्थानक परिसर आणि दत्त मंदिर परिसर गारगोटी-पाटगाव वर्दळीच्या रस्त्यामुळे अपघातप्रवण बनत आहे. येथे थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाथाजी पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे, गारगोटीचे उपअभियंता महेश कांजर यांना निवेदन सादर करून दोन्ही ठिकाणी रस्त्यावरील सूचना, पट्टे आणि वाहतूक नियंत्रणासाठी थर्मोप्लास्टिक पेंट करावे, अशी मागणी केली.
एक-दोन महिन्यांत दोन्ही ठिकाणी अपघात घडले आहेत. अनेक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले. या अपघातांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शारीरिक नुकसान झाले. वर्षभरापूर्वी प्रथमेश कुंभार या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. आकुर्डेतील दत्त मंदिर परिसर आणि बसस्थानक परिसरात वाहतुकीची वर्दळ असल्याने हे दोन्ही भाग अधिक धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे रस्त्यावर स्पष्ट दिशादर्शक रेषा, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर मार्किंग आणि इशारा चिन्हे थर्मोप्लास्टिकद्वारे करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याच मागणीला पाठिंबा देत नाथाजी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. यावेळी शंकर जठार, सागर कुपटे, मोहन सूर्यवंशी, प्रवीण पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT