कोल्हापूर

शक्तीपीठ महामार्गाला कोनवडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध : १७ गावांची सुपीक जमीन धोक्यात; मार्ग रद्द करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी.

CD

09110
भुदरगड तालुक्यातील १७ गावांतील
जमिनी बाधित होण्याचा धोका
गारगोटी, ता. ४ : ‘‘नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातून जाणार असल्याने तालुक्यातील सुमारे १७ गावांतील सुपीक व पिकावू जमीन बाधित होणार आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा ठरणार असल्याचा आरोप करत कोनवडे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देऊन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मार्गामुळे शेती, पाणी स्रोत, तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, या भागातील बहुतांश लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न बंद पडेल आणि त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. तसेच पर्यावरणीय परिणामही गंभीर असू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या भावना व हित लक्षात घेऊन शक्तीपीठ रद्दचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदन देताना माजी उपसरपंच प्रा. हिंदुराव पाटील, निवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील, डी. डी. पाटील, पी. आय. पाटील, विष्णुपंत पाटील, यशवंत लोकरे, रामचंद्र देसाई, वाय. के. पाटील, टी. बी. पाटील, आनंदराव लोकरे, राजेंद्र पाटील, तानाजी पाटील, एकनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT