09180
शक्तिपीठ माथी मारू नका
भुदरगडमधील शेतकऱ्यांचे प्रांतांना निवेदन
गारगोटी, ता. १३ : ‘‘शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारा आणि नको असलेला शक्तिपीठ महामार्ग आमच्या माथी मारू नका,’’ असे साकडे घालत भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन भुदरगड-आजराचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांना दिले.
तालुक्यातील शेतकरी गारगोटी येथे एकत्र जमले व त्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. ५ मे २०२६ रोजी शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यात बाधित गावातील गटनंबर जाहीर झाले आहेत. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. दोन वर्ष १२ जिल्ह्यांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्ग नको म्हणून राज्य शासनासमोर टाहो फोडत असताना जमीन अधिग्रहण आदेश काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून पर्यावरणाची प्रचंड हानी करणारा शक्तिपीठ महामार्ग कधीही होऊ देणार नाही, असा निर्धार केला. यावेळी संदीप देसाई, प्रा. एच. आर. पाटील, अरुण पाटील, रवींद्र नागटिळे, मसणू कांबळे, सुरेश देसाई, कृष्णा भारतीय, सुनील लाढ, सुरेश मोरे, एकनाथ पाटीळ, शहाजी भोसले, तानाजी पाटील, वसंत पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.