कोल्हापूर

एकाग्रता वाढवा, यश मिळवा डॉ. सतीश घाळी

CD

72459
गडहिंग्लज : विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी डॉ. सतीश घाळी, अ‍ॅड. बी. जी. भोसकी, महेश घाळी, सुनील देसाई, विजयकुमार चौगुले आदी.

एकाग्रता वाढवा, यश मिळवा
---
डॉ. सतीश घाळी; जागृती प्रशालेत पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : यशासाठी आवश्यक असलेला कणखरपणा हा संस्कारांच्या केंद्रात दिला जातो. परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. कठोर परिश्रम, दृढ निश्‍चय व एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी केले.
येथील जागृती हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. डॉ. घाळी सभागृहात हा कार्यक़्रम झाला. निबंध, वक्तृत्व, झिम्मा फुगडी, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, धावणे, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, कुस्ती, नृत्य स्पर्धांसह विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना आणि शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव अ‍ॅड. बी. जी. भोसकी म्हणाले, की स्पर्धांमधून शिस्त, सचोटी, धीटपणा, टीमवर्क, वेळेचे नियोजन, पराभव पचविणे, खिलाडूवृत्ती हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित होतात. बौद्धिक व शारीरिक विकासातून करिअर घडविता येते.
डॉ. घाळी, अ‍ॅड. भोसकी, महेश घाळी, सुनील देसाई, मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, विलास शिंदे, डॉ. सुधाकर शिंदे, श्रीरंग तांबे, सुनीता पाटील, अनिता चौगुले, विद्या पन्हाळे, किरण पाटील, शिवाजी अनावरे, रवींद्र लोखंडे, डॉ. देशपांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ‘न्यू होरायझन’च्या खेळाडूंचाही या वेळी सत्कार झाला. क्रीडाशिक्षक संपत सावंत, प्रकाश हरगापुरे, दयानंद ग्वाडी, सचिन मगदूम, अनिल चौगुले यांचा संस्थेतर्फे सत्कार झाला. सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान रोशन पाटील, अक्षता कौजलगी, श्रेयस पन्नोरे, श्रेया बोरवाडकर यांना देण्यात आला. प्राचार्य विजयकुमार चौगुले यांनी स्वागत केले. गीता पाटील व कल्पना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद फुटाणे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT