कोल्हापूर

व्यापारी बैठक

CD

गूळ सौदे आजपासून सुरू होणार
-
अडते, व्यापारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर, ता. ५ ः माथाडी कामगार ५० टक्के मजुरी वाढ देण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने शाहू मार्केट यार्डातील गूळ सौद्याचा पेच निर्माण झाला. यावर पर्याय म्हणून अन्य बाजारपेठातील माथाडी आणून शुक्रवार (ता.६) पासून गूळ सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहूपुरी व्यापारी असोसिएशनमध्ये गूळ अडते, व्यापारी व शेतकरी यांची सायंकाळी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यार्डातील गुळाच्या घाऊक बाजारपेठेत माथाडींनी काम बंद आंदोलन केल्याने सौदे बंद पडले. मात्र, शेतकरी गूळ बाजारात आणत आहेत, मात्र तो गूळ उतरणे भरण्याचे काम ठप्प झाले. परिणामी शेतकऱ्यांचा गूळ पडून आहे. व्यापाऱ्यांनी सौद्यात खरेदी केलेला केलेला गूळ पुढील बाजार पेठेत पाठवण्याचे कामही ठप्प झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. अशात माथाडी कामगार मागणीवर ठाम राहिल्याने गूळ सौदे सुरू होणे मुश्कील झाले. यावर पर्याय काढण्यासाठी व्यापारी, अडते, शेतकरी यांनी एकत्र बैठक घेतली. त्यात अन्य बाजार पेठेतील माथाडी आणून गूळ रवे उतरणे, भरणे, वजन करण्याचे काम होईल. त्यासाठी बाजार समितीनेही सहकार्य करावे, अशा मागणीचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीला सायंकाळी दिले.
बाजार समितीनेही माथाडी बोर्डाने गूळ सौद्यासाठी माथाडी पुरवावेत, अशा मागणीचे पत्र सायंकाळी दिले. तसेच ज्या माथाडींनी गूळ सौद्यावेळी काम बंद आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई का करू नये, या आशयाची नोटीसही माथाडींना बजावली जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT