कोल्हापूर

अजित पवार चंदगड दौरा

CD

अजित पवार यांचा हलकर्णीत
रविवारी नागरी सत्कार
चंदगड, ता. ५ ः चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रविवारी (ता. ८) नागरी सत्कार होणार आहे. हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीत या निमित्ताने शेतकरी मेळावा होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कारही होणार आहे. आमदार राजेश पाटील यांनी ही माहिती दिली.
महाविकास आघाडीच्या कालावधीत पवार यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाच्या विकासकामांसाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यासाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश टोपे, आमदार जयंत पाटील यांचेही सहकार्य लाभले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र कोरोना महामारीमुळे विलंब झाला. तरीही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान गेल्या मार्चच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केले. तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. पवार यांनी यापूर्वीही तालुक्याच्या विकासाला मोठा हातभार लावला आहे. पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्यात सोळा लाख टन ऊस उत्पादन होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT