कोल्हापूर

सोमवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन

CD

जि.प.ची सोमवारी
सर्वसाधारण सभा

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍हा नियोजन मंडळातून या आठवड्यात निधीचे वाटप होणार आहे. त्यामुळे विविध विभागांच्या नवीन योजनांना मंजुरी देण्यासाठी सोमवारी (ता. ९) सर्वासधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या उपस्‍थितीत ही सभा होणार आहे.

गेली वर्षभर विकासकामे ठप्‍प झाली आहेत. जिल्‍हा परिषदेच्या विकासकामांना जिल्‍हा नियोजन मंडळाच्या निधीचा आधार आहे. नियोजन मंडळाकडून जिल्‍हा परिषदेला किमान २०० कोटी रुपयांचा निधी मिळतो. मात्र, राज्यातील सत्ता बदलामुळे, त्यानंतर पालकमंत्री निवडीला झालेल्या विलंबाने व त्याहीपुढे पालकमंत्री निवडीनंतर नियोजनमध्ये काहीच निर्णय न झाल्याने जिल्‍ह्यातील सर्वच विकासकामे ठप्‍प होती. आता मार्च महिना जवळ आल्याने निधी खर्च केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जर हा निधी खर्च झाला नाहीतर तो शासनाला परत पाठवला जाणार आहे. ही नामुष्‍की येऊ नये, यासाठी आता गडबड सुरू आहे.

जिल्‍हा नियोजन मंडळाची बैठक शनिवारी (ता. ७) होत आहे. यात जिल्‍हा परिषदेच्या विविध विभागांनी सादर केलेल्या योजनांची व मागितलेल्या निधीबाबत चर्चा होणार आहे. यातील जी कामे अत्यंत आवश्यक आहेत, नावीण्यपूर्ण आहेत. त्यांना तत्‍काळ निधी दिला जाणार आहे. मात्र, केवळ मंजुरी देऊन कामे मार्गी लागणार नाहीत. तर त्यासाठी जिल्‍हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यताही आवश्यक आहे. यासाठीच सोमवारी (ता. ९) सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

बाबो! प्राजक्ता माळीनं गोरेगावमधील फ्लॅट तब्बल 'इतक्या' कोटींना विकला; व्यवहारामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात!

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : कोस्टल रोडवर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणासह तिघांचा मृत्यू

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

SCROLL FOR NEXT