कोल्हापूर

दुधाळ जनावरांच्या गटासाठी अर्ज करण्याचे आवाहन

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

दुधाळ जनावरांच्या गटासाठी
अर्ज करण्याचे आवाहन

विशेष घटक योजना; ७५ टक्‍के देणार अनुदान

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ९ : जिल्‍हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्‍के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा गट दिला जाणार आहे. ही योजना विशेष घटक विभागाकडून राबवली जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, नवबौ‍द्ध प्रवर्गातील लाभार्थीच यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेसाठी १३ डिसेंबरपासून अर्ज मागवले आहेत. ११ जानेवारीला या योजनेची मुदत संपणार आहे. या योजनेसाठी संबंधितांनी ‘महाबीम्‍स’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

दोन दुधाळ जनावर खरेदीसाठी प्रत्येकी ६३ हजार ७९६ रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. एकूण ३९१ लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, ७५ टक्‍के अनुदानावर १० शेळी व १ बोकड अशा गटासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी ३२१ लाभार्थी पात्र ठरणार आहेत. याचबरोबर जिल्‍हा वार्षिक योजनेतून एकात्‍मिक कुक्‍कुटविकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार रुपयांच्या मर्यादेत ५० टक्‍के अनुदान दिले जाणार आहे. जिल्‍ह्यातील सर्व प्रवर्गातील ५०० लाभार्थींना १०० एक दिवशीय कुक्‍कुट गट वाटप करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT