कोल्हापूर

विद्यापीठ सिनेट सदस्य निवड बातमी

CD

डॉ. दीक्षित, देसाई-महागावकर अधिसभा सदस्य

राज्यपालांकडून नियुक्ती : एकूण ९ जणांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये ९ जणांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापुरातून प्रा. डॉ. घनश्याम दीक्षित आणि शहनिल देसाई महागावकर यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील श्रीनिवास ऊर्फ विशाल गायकवाड आणि संजय परमणे या माजी अधिसभा सदस्यांची राज्यपालांकडून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भवनातून याबाबतचे पत्र आज कुलगुरूंना देण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे संचालन अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेकडून केले जाते. अधिसभेवर काही सदस्य पदवीधर, शिक्षक यातून निवडून जातात तर काही सदस्यांची नियुक्ती कुलपती (राज्यपाल) करतात. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. त्यानंतर आज राज्यपाल भवनातून नियुक्त सदस्यांची नावे पत्राद्वारे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पाठवण्यात आली. राज्यपालांचे मुख्य सचिव संतोष कुमार यांनी याबाबतचे पत्र पाठवले आहे. यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शहनिल फत्तेसिंह देसाई - महागावकर आणि डॉ. घनश्याम दीक्षित, काव्यश्री नलवडे यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून श्रीनिवास ऊर्फ विशाल गायकवाड, संजय परमणे, डॉ. मनोजकुमार पाटील, वनिता तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्ह्यातून सारंग कोल्हापुरे, सुजित शेडगे यांना नियुक्त करण्यात आले.
--------------------------------------------

निवृत्त प्राध्यापकांची पहिल्यांदाच नियुक्ती
डॉ. घनश्याम दीक्षित हे ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ आहेत. विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले आहेत. विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापकांची अधिसभा सदस्य म्हणून राज्यपालांकडून नियुक्ती होणे ही पहिलीच घटना आहे.
--------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT