कोल्हापूर

२२ जानेवारीला मैफल रंग-सुरांची

CD

22936 (संग्रहित छायाचित्र)

75358
......

२२ जानेवारीला रंगणार ‘मैफल रंग-सुरांची’

ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांचा होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः येथील रंगबहार संस्थेच्या वतीने २२ जानेवारीला ‘मैफल रंग-सुरांची’ हा उपक्रम रंगणार आहे. टाऊन हॉल बागेत होणाऱ्या या उपक्रमात (कै) श्यामकांत जाधव रंगबहार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांना दिला जाणार आहे. ‘नाबार्ड''चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
मैफलीत शिवराज पाटील, डॉ. पूजा पाटील-गोटखिंडीकर यांचे गायन होणार असून त्यांना नरेंद्र पाटील, कैवल्य पाटील यांची साथसंगत असेल. चित्रकार गिरीश आदन्नावर (निपाणी), मीनाक्षी सदलगे (बेळगाव), भारतभूषण होगाडे, दिलीप दुधाणे, केदार पवार (इचलकरंजी), शुभम गावडे (कोल्हापूर), शिल्पकार अमोल हरेकर (मुंबई), रोहन तळवडेकर (सिंधुदुर्ग) यांचा कलाविष्कार असेल. दरम्यान, मैफलीच्या निमित्ताने माजगावकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार असून २१ ते २३ जानेवारीदरम्यान रसिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मैफलीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक व्ही. बी. पाटील, अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT