कोल्हापूर

समरजितसिंह जमिनीच्या तुकड्याचे, मुश्रीफ विचारांचे वारसदार

CD

समरजित जमिनीच्या तुकड्याचे वारसदार
---
भय्या माने; कागलची जनता मुश्रीफांच्या पाठीमागे ठाम
---
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १४ : आमदार हसन मुश्रीफ यांनी ६०० मंदिरे बांधली. गोरगरिबांना संकटात मदत केली. तेच खऱ्या‍ अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत. समरजित घाटगे हे जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असल्याची टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हा बँकेचे संचालक भय्‍या माने यांनी केली.
सकाळी समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार मुश्रीफ यांच्यावर हल्‍लाबोल केला. याला कागल राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देण्यात आले. या वेळी युवराज पाटील, महिलाध्यक्षा शीतल फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, प्रवीणसिंह पाटील, शशिकांत खोत, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.
भय्या माने म्हणाले, की आमदार मुश्रीफांवर ‘इडी’चा छापा टाकण्याचे षडयंत्र हे कुणाचे आहे, हे सर्वांना माहिती आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची त्यांनी सपत्‍नीक भेट घेतली. एका बाजूला ते बँकेसाठी विविध योजना देण्यासाठी भेटलो असल्याचे सांगत असले, तरी त्यांचा उद्देश वेगळा होता. मंत्री कराड यांच्याकडे प्राप्तिकर आणि ‘इडी’ हे विषय येतात. त्यामुळे ‘इडी’च्या छाप्यासंदर्भात भेटले, असे म्‍हणण्यास वाव असल्याचे व त्यांच्याच कार्यकर्त्याने भाकित केल्याने या छाप्यामागे कोण आहे, हे स्‍पष्‍ट होते. आमदार मुश्रीफ हे पाच वेळा आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांची अवस्‍था ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखी होईल. आमदार मुश्रीफ यांच्यामागे कार्यकर्ते ४० वर्षांपासून आहेत. त्यांना कार्यकर्ते बोलावण्याची गरज लागत नाही. कागलची जनता मुश्रीफ यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे.

.......

आम्‍ही बोलायला लागलो तर...
हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याला लोकांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. सर्वसामान्य लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. घाटगे यांनी मुंबई आणि दिल्ली वाऱ्या करून शाहू दूध संघासाठी बोगस सबसिडी मिळवली. इतकेच नव्हे, तर अशा अनेक गोष्टी आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर त्यांची पळताभुई थोडी होईल, असा इशारा सूर्यकांत पाटील यांनी समरजित यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT