कोल्हापूर

पिचकारी माराल तर खबरदार

CD

इचलकरंजी महापालिका वापरणे
----------------
पिचकारी माराल तर खबरदार
फौजदारी कारवाईचा आयुक्तांचा इशारा; मनपा प्रशासकीय इमारतीतील चित्र बदलणार

इचलकरंजी, ता. २० ः येथील महापालिका प्रशासकीय इमारतीच्या भिंती गुटखा, तंबाखू, पान खाऊन पिचकारी मारल्यामुळे रंगल्या आहेत. एकीकडे शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. दुसरीकडे खुद्द महापालिका प्रशासकीय इमारतीतच अस्वच्छता आढळून आली आहे. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून त्याविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुढे पिचकारी मारल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिला आहे.
सध्या महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छतेच्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र महापालिका प्रशासकीय इमारतीतच गुटखा, तंबाखू, पान खाऊन पिचकारी मारण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी, भिंतीसह कोपरे रंगले आहेत. मुळात रस्त्यासह सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी आहे. असे असतानाही त्याला खुद्द महापालिकेतच हरताळ फासला जात आहे. अशाप्रकारे गैरवर्तन करणे हा गुन्हा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आयुक्त देशमुख हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यासाठी त्यांनी आज थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय एका आदेशाद्वारे जाहीर केला आहे.
यापुढे प्रशासकीय इमारतीत पिचकारी मारून अस्वच्छता केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना विभागप्रमुखांना दिली आहे. तंबाखू, गुटखा किंवा तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे, पान खाऊन थुंकणे व धुम्रपान करणे अशा प्रकारचे गैरकृत्य आढळल्यास संबंधित कर्मचारी, अधिकारी अथवा पदाधिकारी यांचे नाव तत्काळ आयुक्त व उपायुक्त कार्यालयास कळवण्याबरोबरच पुढील मान्यता घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत संबंधित विभागाने खबरदारी न घेतल्यास अथवा त्याबाबतचा अहवाल सादर न केल्यास त्या विभागातील सर्व कर्मचारी यांना प्रत्येकवेळी दोनशे रुपये व विभागप्रमुखांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्याची वसुली वेतनातून केली जाणार आहे.
-
कारवाईचे अधिकार निश्‍चित
पिचकारी मारणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अधिकार आरोग्य विभागाकडील स्वच्छता निरीक्षक, भरारी पथक व खातेप्रमुख यांना दिले आहेत. याकडे जाणीवपर्वक दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त देशमुख यांनी दिला आहे.
-
अन्य इमारतीमध्येही बंदी घाला
महापालिकेच्या अनेक इमारती आहेत. यामध्ये नाट्यगृहासह काही महत्त्‍वाच्या इमारतींचा समावेश आहे. येथेही अशाप्रकारे पिचकारी मारून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा इमारतींमधील अस्वच्छतेचे किळसवाणे चित्र बदलण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT