कोल्हापूर

मोफत रेबीजचे लसीकरण

CD

मोफत रेबीजचे लसीकरण

प्रजासत्ताकदिनी आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २३ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत रेबीज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे लसीकरण केले जाणार आहे. गॅप चॅरिटेबल ट्रस्‍ट (नरेवाडी), हरेकृष्‍णा डिस्‍ट्रीब्युटर्स (कोल्‍हापूर) व गुडमन केमिस्‍ट(मुंबई) यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. स्‍टार टॉवर, पाच बंगला, शाहूपुरी या ठिकाणी या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

रेबीज (पिसाळणे) हा आजार विषाणूजन्य असा प्राणघातक आजार आहे. एकदा का हा आजार झाला तर नंतर कोणताही उपचार होत नाही. हा आजार कोल्‍हा, लांडगा, तरस, वटवाघूळ, मुंगूस, घूस या जंगली प्राण्यांसह गाय, म्‍हैस, शेळी, मेंढी, डुकरे, उंट, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांनाही होतो. देशात दरवर्षी या आजाराने २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. साधारण ३ ते ६ महिन्यांच्या रस्‍त्यावरील पिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. चावा घेतल्यानंतर लाळेमार्फत हे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात व मेंदूमध्ये जाऊन आजार निर्माण करतात. पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ उघड्या जखमेवर पडली तरी याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रेबीजचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सुधाकर पाटील यांनी केले आहे.
मोफत रेबीज लसीकरणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या फॉर्मच्या माहितीसाठी यासाठी ९६२३२३६४६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT