कोल्हापूर

रोटरी एज्युकेशनल एक्सोची जय्यत तयारी

CD

ich308.jpg

इचलकरंजी ः येथे होणाऱ्या रोटरी एज्युकेशनल एक्सोच्या अंतिम तयारीला गती आली आहे.

रोटरी एज्युकेशनल एक्सोची जय्यत तयारी
महाराष्ट्रातील नामवंत तज्‍ज्ञाचे होणार मार्गदर्शन : दैनिक सकाळ माध्यम प्रायोजक

इचलकरंजी, ता. ३० ः रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हतर्फे येथे आयोजित केलेल्या रोटरी एज्युकेशनल एक्सोची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान हा एक्सो राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक सकाळ माध्यम समूह आहे.
शहरात प्रथमच इतक्या भव्य प्रमाणात शैक्षणिक उपक्रम होत आहे. यामध्ये विविध नामांकित संस्थांचा सहभाग आहे. त्यासाठी आवश्यक तयारी गतीने सुरू आहे. कार्यक्रमस्थळी सुसज्ज असा मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणीच विविध तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. पालक व विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्याचे काम तज्‍ज्ञ मंडळी करणार आहेत. यामध्ये तज्‍ज्ञ ‘हेड हंटर’ गिरीश टिळक, करीअर मार्गदर्शक संतोष कार्ले, मार्केटिंग विषयातील तज्‍ज्ञ गौरी सरदेसाई, मॅनेजमेंट गुरु पल्लवी देसाई, यशस्वी निर्यातदार निकुंज बगडिया, ड्रोन व आयटी टेक्नॉलॉजीतील तज्‍ज्ञ अजिंक्य दीक्षित, एक्स्पर्ट ट्रेनर अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे. सर्वांसाठी हा उपक्रम मोफत ठेवला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष संदीप कल्याणकर व प्रोजेक्ट चेअरमन राजेश कोडूलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT