कोल्हापूर

‘चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यास न्यायालयात धाव’

CD

‘चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या
कमी केल्यास न्यायालयात धाव’
कोल्हापूर, ता. ३० ः महानगरपालिकेकडून शासनाकडे पाठवण्यात आलेला आकृतीबंध रद्द करून चतुर्थश्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करू नये. अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असे निवेदन माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे, स्वच्छता, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, दवाखाना यातील कर्मचारी महत्वाची कामे करतात. आकृतीबंधामध्ये त्यातील पदे कमी करण्याचा प्रयत्न आहे. यातून हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल. तसेच तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती भविष्यात बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. खर्चात कपात करण्याच्या धोरणाचा फटका या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. ज्या पदाचा अधिक पगार, संख्या जादा अशा अधिकाऱ्यांच्या जागा कमी होणे आवश्यक आहे. पण वरिष्ठ पदे सुरक्षित व जनतेच्या सुविधांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊन नागरी सुविधांवर परिणाम होणार आहे. काही सेवांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे यातून दिसून येत आहे. आकृतीबंधाच्या गोंडस नावाखाली सुरू असलेला प्रयत्न रोखला जावा. शासनाने विचार केला नाही तर नाईलाजास्तव न्यायालयात धाव घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT