कोल्हापूर

गुदमरून मृत्यू

CD

चिमुकल्याचा पिठात पडून
गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू
वडणगे, ता. ३ : तोल जाऊन पिठाच्या बुट्टीत पडल्याने चिमुकल्याला आज आपला जीव गमवावा लागला. कृष्णराज राजाराम यमगर (वय ९ महिने, रा. जुना वाशीनाका) असे त्याचे नाव आहे. वडणगे (ता. करवीर) येथे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घरच्यांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले; मात्र, नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जुना वाशीनाका येथील सुप्रिया राजाराम यमगर या आपला मुलगा कृष्णराज याला घेऊन वडणगे (ता. करवीर) येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. सायंकाळी कृष्णराज वॉकरमधून चालत होता. चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत तोल गेला. आजीने त्याला या बुट्टीतून बाहेर काढले. त्यावेळी कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले होते. ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले. हे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात नेले; मात्र, चिकटलेल्या पिठामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT