८०५१०
कोल्हापूर : आरोग्यम् धनसंपदा प्रदर्शनात निरोगी आरोग्याची माहिती तज्ज्ञांकडून घेण्यासाठी उपस्थित नागरिक.
आरोग्यम् धनसंपदा प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद
आज शेवटचा दिवस; ‘सकाळ’-तनिष्का माध्यम प्रायोजक
कोल्हापूर, ता. ४ : स्वयंप्रभा मंच आयोजित आरोग्यम् धनसंपदा आरोग्य प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून हे प्रदर्शन राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील भवन येथे सुरू आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सहभागी हॉस्पिटल्स, आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्थांकडून विविध तपासण्या मोफत व सवलतीत दिल्या जात आहेत. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे तनिष्का व्यासपीठ प्रदर्शनासाठी माध्यम प्रायोजक आहे.
दरम्यान प्रदर्शनात आज पहिल्या सत्रात पूर्वआरोग्य तपासणी विषयावर पॅथॉलॉजिस्ट डॉ. अश्विनी माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘तीन महिन्यांतून किंवा सहा महिन्यातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्याची तपासणी करून घ्यावी.’
दुसऱ्या सत्रात ॲपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॅन्सरतज्ज्ञ डॉ. यशस्वी चौधरी म्हणाल्या, ‘लवकर निदान झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो. महिलांनी शरीरात बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’
सकाळी उपाशीपोटी तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यास आणि वजन वाढू न दिल्यास ह्दयरोग टाळू शकतो. योग्य आहार, ताणतणाव नियंत्रणासाठी प्राणायाम आणि योगासने केल्यास फायदा होऊ शकेल. पुरेशी झोप घेतल्यास हृदयरोग टाळता येतो, असे मत माधवबाग ताराबाई पार्कचे संचालक डॉ. विजय बांगर यांनी केले.
योग्य आहार, ताणतणाव नियंत्रण, पुरेसा व्यायाम ही त्रिसूत्री अंमलात आणल्यास फिट राहू शकतो, असे मत फिजिओथेरपीस्ट डॉ. प्रांजली धामणे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. विद्या कुलकर्णी यांनी आहाराबद्दल तर सुवर्णा करमळकर यांनी योग, प्राणायामबद्दल माहिती दिली. स्वयंप्रभा मंचच्या सारिका बकरे, शुभदा हिरेमठ आणि अजित तांबेकर उपस्थित होते.
-------
आज प्रदर्शनात
सकाळी ११.१५ वाजता : विषय : अतिजोखमीतील गरोदरपण व नवजात शिशुसंगोपन, व्याख्याते : डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉ. संगीता देसाई व डॉ. हेमंत भारती.
दुपारी १२ वाजता : विषय : स्त्रीत्वाचे फूल जपताना, व्याख्याते : नॅचरल सॅनिटरी पॅड्सच्या संचालिका प्रियंका जामसांडेकर
सायंकाळी साडेचार वाजता : विषय : मधुमेह कोरोनानंतरचा, व्याख्याते : वैद्य शशिकांत कुंभार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.