कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात गर्दी

CD

80682

माघी पौर्णिमा, सुटीमुळे अंबाबाई मंदिरात गर्दी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः रविवारी सुटीचा दिवस आणि माघी पौर्णिमेनिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली. विशेषतः पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अंबाबाईच्या दर्शनासोबतच शहरातील रंकाळा, न्यू पॅलेस व त्यानंतर जोतिबाचे दर्शन असा बेत भाविकांनी आखला. त्यामुळे दिवसभर या परिसरात भाविकांची गर्दी होती.
भाविकांचे जथ्येच्या जथ्ये महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, चप्पल लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसत होते. भाविकांनी महाद्वार रोड व चप्पल लाईनला खरेदीचा आनंद लुटला. परगावांहून आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर कोल्हापुरी जेवणावर ताव मारला. त्यामुळे दुपारी शहरातील हॉटेल्समध्येही गर्दी दिसत होती. दरम्यान, अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.

चौकट
पागा बिल्डिंगमधील स्वच्छतागृहामुळे भाविकांची सोय
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सोय नव्हती. कुचंबणा सहन करत भाविकांना परतावे लागत होते. याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर भाविकांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पागा बिल्डिंगमधील स्वच्छतागृहाची दुरूस्ती करून देवस्थान समिती व छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे असंख्य भाविकांना दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT