कोल्हापूर

१५ कोटींच्या ठेवी तरीही वर्गणीची वेळ

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

१५ कोटींची ठेव तरीही
खेळाडूंवर ‘वर्गणी’ची वेळ

शिंगणापूर शाळेतील अजब कारभार; प्रशासकांनी कान टोचण्याची गरज

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ७ : राज्यस्‍तरीय शालेय खो खो (मुली) स्‍पर्धेत अव्‍वल स्‍थान पटकावलेल्या शिंगणापूर क्रीडा प्रशालेच्या खेळाडूंवर ‘वर्गणी’ काढून किट घेण्याची वेळ आली आहे. या शाळेतील खेळाडूंच्या सोयीसुविधेसाठी निधीची कमतरता पडू नये, यासाठी तत्‍कालिन पदाधिकारी, अधिकारी यांनी १५ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. या ठेवीच्या व्याजातून शाळेच्या सर्व गरजा सहज पूर्ण करणे शक्य आहे. मात्र, या पैशावर खेळाडूंपेक्षा त्यांच्यासाठी नेमलेली यंत्रणाच पोसली जात आहे.

शिंगणापूर क्रीडा शाळेतील मुलांनी ऑलिम्‍पिकमध्ये चमकदार कामगिरी करावी, या उद्देशानेच प्रशाला सुरू करण्यात आली. यात विविध खेळांचा समावेश करण्यात आला. निधीसाठी पदाधिकाऱ्यां‍कडे अर्ज, विनवण्या करण्याची गरज भासू नये म्‍हणून १५ कोटींच्या ठेवीही ठेवल्या. तरीही पदाधिकाऱ्यां‍नी उदार हेतूने शाळेच्या विकासकामासाठी जिल्‍हा नियोजन समितीतून निधी उपलब्‍ध करून दिला. मात्र, कोरोनापासून शाळेची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. आता जिल्‍हा परिषदेत पदाधिकारी नाहीत व अधिकाऱ्यां‍कडे शाळेसाठी वेळ नाही, अशी परिस्‍थिती आहे.

शाळेचा कारभार एखाद्या चांगल्या, प्रामाणिक, होतकरू माणसाकडे देणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षण व प्रशासन विभागाला आजपर्यंत असा अधिकारी सापडलेला नाही. शाळेत मनमानी पद्ध‍तीने कर्मचारी व प्रशिक्षक नियुक्‍ती, साहित्य खरेदी व किरकोळ कामातून सध्या चांगलीच धुलाई सुरू आहे. खेळाडूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सोयीची कामे करून घेतली जात असल्याचा सूर आहे. गेले वर्षभर खेळाडूंना किट दिलेले नाही. विमा उतरलेला नाही. स्‍पर्धेसाठी प्रवास खर्च लवकर दिला जात नाही. प्रशिक्षकांशी संवाद नाही. नाश्‍‍ता, जेवणातील पदार्थ गायब होत आहेत. मेडिकल सुविधा मिळत नाहीत, या सर्व गंभीर बाबी आहेत. त्यामुळे प्रशासकांनीच आता शाळा प्रशासनाचे कान टोचण्याची गरज निर्माण झाली आहे.

....
मॅटप्रमाणे इतर साहित्य खरेदी संशयात
मुलांच्या जेवण, नाश्‍‍त्यातील पदार्थ गायब
तक्रारदार विद्यार्थ्यांना ठरवून ‘आउट’

....
कोट
‘अत्यंत उदात्त हेतूने ही क्रीडा प्रशाला सुरू केली आहे. अधिकाऱ्यां‍नीही त्यावेळी चांगली साथ आणि सहकार्य दिल्यानेच ही शाळा नावारूपाला आली. मात्र जिल्‍हा परिषद अधिकाऱ्यां‍नी या शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच शाळेत गलथान कारभार वाढला आहे. कंत्राटदार, पुरवठादार, मेस चालक, प्रशिक्षक, कर्मचारी यांना पोसण्यासाठी शाळेची स्‍थापना केली की काय, अशी आताची परिस्‍थिती आहे. या सर्वांची गंभीर दखल प्रशासकांनी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.

- उमेश आपटे, माजी अध्यक्ष, जिल्‍हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT