कोल्हापूर

आगारावर उद्या मोर्चा

CD

चंदगड आगारावर उद्या प्रवाशांचा मोर्चा

चंदगड ः येथील एसटी आगाराकडून प्रवाशांना योग्य सेवा द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १०) आगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वतीने अॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील आदींनी आगारप्रमुखांना याबाबत निवेदन दिले आहे. आगाराकडील बसेस अत्यंत जुन्या असून त्या सतत नादुरुस्त होतात. या गाड्या बदलून चांगल्या गाड्यांची व्यवस्था करावी, आगाराकडे पुरेसे चालक-वाहक नसल्याने ऐन वेळेला गाड्या रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. गाड्यांची संख्या वाढवण्याबरोबरच पुरेसे कर्मचारी ठेवावे. वेळापत्रकानुसार गाड्या सोडाव्या, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून योग्य वेळापत्रक तयार करावे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी बी. डी. पाटील, विलास पाटील, एन. आर. भोगुलकर, सचिन बल्लाळ, रफिक नेसरीकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

धक्कादायक! वैनगंगा नदी पात्रातच अंत्यसंस्कार; नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा, प्रशासनाचं दुर्लक्ष

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT