कोल्हापूर

हरिओमनगर कचरा

CD

81433

हरिओमनगर परिसरातील माळ
बनत आहे कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड

कोल्हापूर, ता. ८ ः हरिओमनगर परिसरातील रिकामा माळ कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड बनले आहे. येथे परताळ्यातील तसेच इतर ठिकाणचा कचरा टाकला जात असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडे तक्रारी करूनही कचरा टाकण्याचे थांबवले जात नसल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
शालिनी सिनेटोनच्या परिसरात असलेला माळ व लाड मळ्याजवळील खाण ही कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. रंकाळा पदपथाच्या रस्त्याजवळ असलेल्या या ठिकाणामुळे दररोज दोन ते तीन डंपर विविध प्रकारचा कचरा येथे आणून टाकला जात आहे. येथे नवीन अपार्टमेंट उभारल्या आहेत. त्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. काही जागा खासगी असली तरी तिथे कचरा टाकला जाऊ नये म्हणून अनेकवेळा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर काही काळ कचरा बंद झाला होता. पण, आजपासून पुन्हा कचरा टाकला जात आहे. तसेच महापालिकेच्या वतीने परताळ्यातील गाळ व झुडुपे स्वच्छ केली जात आहेत. तो सर्व कचराही आता या परिसरात टाकला जात आहे. यापूर्वी इराणी खण स्वच्छ करताना त्यातीलही कचरा टाकण्यासाठी ही जागा वापरली होती. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास महापालिकेने मज्जाव करावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

SCROLL FOR NEXT