कोल्हापूर

महापालिका कामकाज थंड

CD

अधिकाऱ्यांअभावी
कामकाज थंडावले

कोल्हापूर, ता. ८ ः राज्य माहिती आयुक्तांकडे असलेल्या अपिलासाठी आज अधिकारी, अन्य कर्मचारी पुण्याला गेल्याने महापालिकेतील कामकाज थंडावल्याचे दिसत होते. विभागीय कार्यालयात ‘साहेब नाहीत’ हे ऐकून नागरिक परत जात होते. मुख्य इमारतीतील चौकाचा आवारही वाहनांअभावी रिकामा होता.
आरोग्य, पवडी, विभागीय कार्यालये, नगररचना विभागाकडील बहुतांश अपिल माहिती आयुक्तांकडे होते. त्यासाठी संबंधित विभागातील माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी तसेच सहाय्यक कर्मचारी कालपासूनच पुण्याला रवाना झाले. काही विभागातील अधिकारी एकत्र वाहनाने गेले तर त्यांचे सहाय्यक वेगवेगळ्या माध्यमातून पुण्याला गेले. आजही काही रवाना झाले. त्यामुळे महापालिकेच्या चौकात अनेक अधिकाऱ्यांची वाहने आली नाहीत. त्यामुळे चौकाचा आवार रिकामा वाटत होता. प्रशासकही बैठकांसाठी अन्य कार्यालयात गेल्या होत्या. अपिलासाठी विविध विभागांचे प्रमुख गेले असल्याने त्या विभागातील अन्य कर्मचारीही जागेवर दिसत नव्हते. मुख्य इमारत सोडून इतर ठिकाणी असलेल्या कार्यालयात तर शांतता जाणवत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

Pune Land Scam: कोथरूड भूखंड व्यवहारात ५० कोटींची फसवणूक; बंगळूरच्या नामांकित बांधकाम कंपनीसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT