कोल्हापूर

मानवाधिकार

CD

81591

मानवी हक्काची पायमल्ली झाल्यास तक्रार करा
सदस्य भगवंत मोरे; आयोगाकडून सुनावणी; ३५ तक्रारींवर निर्णय

कोल्हापूर, ता. ९ : मेघोली धरणामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी. धरणाचे काम तत्काळ करावे. वरिष्‍ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार आज राज्याच्या मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवंत मोरे, एम. ए. सय्यद यांच्याकडे केली. येथील शासकीय विश्रामगृहात सुनावणी झाली. एकूण ३५ तक्रारी ऐकून घेऊन निर्णय दिला. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मानवी हक्काची पायमल्ली होत असेल तर संबंधितांनी आयोगाकडे तक्रार करावी, असे आवाहन मोरे यांनी केले.
दुपारनंतर त्यांनी विधी विभागाच्या विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे जनजागृती शिबिर घेतले.
जनता नागरी निवारा संघटनेतर्फे शिवाजीराव परुळेकर म्हणाले, ‘‘मेघोली धरण फुटल्याने चार ते पाच गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वर्षात धरण बांधण्याची ग्वाही दिली होती. याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना दिलेली भरपाई कमी आहे. धरण का आणि कोणामुळे फुटले हे सांगितले जात नाही. धरणाचे बांधकाम वेळेत झाले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. सध्या चालढकल सुरू आहे. याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा नाही. यावर भुदरगड तहसीलदार वरुटे म्हणाल्या, ‘‘महसूलकडून सुविधा दिल्या आहेत. धरण फुटल्यानंतर शेतीचे नुकसान झाले. पण, सर्व शेतीचे सपाटीकरण व शासकीय नियमानुसार भरपाई दिली आहे. धरण तत्काळ बांधावे यासाठी शासनाकडेही प्रस्ताव पाठवला आहे.’’ सय्यद म्हणाले, ‘‘शासकीय सेवक, कर्मचाऱ्यांची कायद्याप्रमाणे जबाबदारी निश्‍चित केली आहे. त्यांचे पालन करताना मानवी हक्कांचे उल्लंघन झाले तर, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.’’

चौकट
आयोगाची शाखा किंवा संघटना नसते
मानवी हक्कासाठी काम करता येईल. पण, मानवी हक्क आयोगाची शाखा किंवा संघटना नसते. आयोगाचे सदस्य कोणत्याही प्रकारचे कार्ड देत नाहीत, असेही सदस्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT