कोल्हापूर

डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती

CD

gad94.jpg
81567
गडहिंग्लज : डॉ. झाकीर हुसेन विद्यालयात डॉ. हुसेन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी अझर मकानदार, इक्बाल नंदीकर, शकील जमादार, जमीर पटेल उपस्थित होते.

डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती
गडहिंग्लज : येथील नगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन विद्यालयात डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती साजरी केली. अझर मकानदार प्रमुख वक्ते होते. वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण झाले. मुख्याधिकारी स्वरुप खारगे, प्रशासनाधिकारी रमेश कोरवी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष इक्बाल नंदीकर, इम्रान मुल्ला, शकील जमादार, सलीम नूलकर, अझरुद्दीन बोजगर, मलीकजान नदाफ, मुबीन नदाफ, हाफीज सद्दाम, ताकीज मुबारक, आशपाक किल्लेदार, श्री. हलगले आदी उपस्थित होते. कुमनळी यांनी प्रास्ताविक केले. जमीर पटेल यांनी सूत्रसंचालन केले. मन्सूर मुल्ला यांनी आभार मानले.
------------
शिंदे हायस्कूलच्या उपकरणाची निवड
गडहिंग्लज : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन इन्स्पायर अ‍ॅवार्ड प्रदर्शनात येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्या प्रतिक पाटील याने तयार केलेल्या स्मार्ट हेल्मेट या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली. जिल्ह्यातून १४१ उपकरणाची झाली. त्यामध्ये १४ उपकरणाची निवड होवून राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्डसाठी निवडले गेले. सध्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अनेकांचे जीव जात आहेत. यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केल्यास जीव वाचवला जावू शकतो. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांचे प्रोत्साहन तर श्रीधर खोराटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------------------------------------
रेडेकर कॉलेजच्या संघाला विजेतेपद
गडहिंग्लज : गडहिंग्लज मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशनतर्फे आयोजित वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित खेळाडूंच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कै केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद मिळवले. स्पर्धेत गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यातील १३ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात रेडेकर संघाने भुदरगड संघाला पराभूत केले. महागाव संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रेडेकर संघात डॉ. अमोल जाधव, डॉ. स्वप्नील चव्हाण, डॉ. निलेश राजमाने, डॉ. शैलेंद्र सावंत, डॉ. शुभम पाटील, डॉ. आशिष घाडी, डॉ. ऋषीकेश गुरव, डॉ. श्रीधर बेली, डॉ. शिवम चोपने, डॉ. गजानन सांगळे, डॉ. आशितोष शिंदे या खेळाडूंचा समावेश होता. उदयकुमार कोळी यांनी व्यवस्थापन केले. संस्थाध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव सुनिल शिंत्रे, प्राचार्या विणा कंठी, उपप्राचार्य पंकज विश्‍वकर्मा यांनी विजेत्या संघाचा गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT