कोल्हापूर

राजकारणापेक्षा ‘सुटा’चे विद्यापीठ विकासाला प्राधान्य

CD

राजकारणापेक्षा विद्यापीठ विकासाला
‘सुटा’चे प्राधान्य ः डी. एन. पाटील

कोल्हापूर, ता. ९ ः आमच्याजवळ संख्या पुरेशी नसल्याचे माहीत असूनही शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तत्वासाठी लढलो. या निवडणुकीत सुटाचा (शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ) नैतिक विजय झाल्याचे आम्ही मानतो. राजकारणापेक्षा सुटाने विद्यापीठाच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून, यापुढेही देत राहील, असे सुटाचे जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांनी आज सांगितले. आमच्याकडे फक्त ९ मते असताना व्यवस्थान परिषदेच्या निवडणुकीत प्रा. निवास वरेकर यांना १४ मते मिळाली. म्हणजे विद्यापीठ विकास आघाडीची ५ मते फुटली. श्‍वेता परूळेकर यांनाही २ मते जादा मिळाली. याचा अर्थ विकास आघाडीची एकूण ७ मते फुटली. या आघाडीने निवडून दिलेल्या तसेच नियुक्त केलेल्या सदस्यांना विकास आघाडीलाच मतदान करावे असे सांगावे लागले. शक्ती प्रदर्शन करावे लागले. आपले सदस्य फुटू नयेत यासाठी आटापिटा करावा लागला. त्याचाच अर्थ आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यात नाराजी आहे. सुटाने नेहमीच विद्यापीठाच्या विकासासाठी, भ्रष्टाचार मुक्त कारभार, विद्यार्थी आणि प्राध्यापक हित लक्षात घेऊन वेळोवेळी आपला लढा कायम ठेवला आहे. विविध अधिकार मंडळांवर कुलगुरू नियुक्त सदस्यांची संख्या जास्त ठेवल्याने निवडणुकीत विषमता दिसत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT