कोल्हापूर

अल्पवयीन विवाहिता चौघांवर गुन्हा दाखल

CD

अल्पवयीन विवाहिता प्रसूती
प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर, ता. ९ ः पती, सासू, सासरे आणि अल्पवयीन विवाहितेची आई आशा चौघांच्या विरोधात आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी विभाग) यांच्याकडील पर्यवेक्षिका टी. एम. मुल्लाणी यांनी याची फिर्याद आज सायंकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. कसबा बावडा परिसरातील खासगी रुग्णालयात काल (बुधवार) अल्पवयीन विवाहित मुलीची प्रसूती झाली होती. यानंतर रात्री उशिरापर्यंत जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. आज गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी मुल्लाणी यांनी प्रसूती झालेली मुलगी आणि तिच्या आईचे जबाब घेतले होते. त्यानुसार त्यांनी आज फिर्याद दिली आहे. बाल विवाहाचा मूळ गुन्हा हा मंगसुळी (कर्नाटक) येथे झाला आहे, त्यानुसार हा गुन्हा तेथील पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक श्‍वेता पाटील यांनी दिली.
दरम्यान, डॉक्टरांनी मुलीचे आधार कार्ड पाहून प्रसूती केल्याचे प्रथमदर्शनी दिसले आहे. पुढील तपासात हे आधार कार्ड बनावट आहे की नाही, याचा तपास केला जाणार आहे. प्रत्यक्षात आधार कार्डवर वय १९ दिसत असले तरीही मुलीच्या शाळेच्या दाखल्यानुसार ती अल्पवयीन असल्याचे दिसले आहे. त्यामुळेच अल्पवयीन विवाहीहित मुलीचा विवाह करून बाल विवाह प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केले आहे. यानुसार अल्पवयीन विवाहितेच्या आईसह पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलीची प्रसूती झाल्यामुळे पतीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT