कोल्हापूर

भूसंपादनाच्या सहा दाव्यांमध्ये तडजोड

CD

GAD126.JPG
82268
गडहिंग्लज : लोकअदालतीत तडजोड झालेल्या प्रकरणातील वादी व प्रतिवादीसोबत न्या. ओंकार देशमुख यांच्यासह वकील, कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
भूसंपादनाच्या सहा दाव्यांमध्ये तडजोड
गडहिंग्लजला लोकअदालत : १२८ प्रकरणातून एक कोटीची वसूली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील तालुका विधी सेवा समितीतर्फे झालेल्या लोकन्यायालयात भूसंपादन भरपाई संदर्भातील सहा दाव्यांमध्ये तडजोड झाली. या लोकन्यायालयात दाखल व दाखलपूर्व अशा १२८ प्रकरणांमधून १ कोटी १६ हजार रुपयांची तडजोडीने वसूल झाले.
अतिरिक्त जिल्हा व दिवाणी न्यायालयात ही लोक अदालत झाली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख, दिवाणी न्यायाधीश जी. व्ही. देशपांडे व सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. राठोड यांच्या नेतृत्वाखालील तीन पॅनेलसमोर ही लोक अदालत चालली. न्या. देशमुख यांच्या पॅनेलसमोरील १६ न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये ५५ लाख ५ हजार रुपये तडजोडीने निकाली झाली. न्या. देशपांडे यांच्याससमोर ७ न्यायप्रविष्ठ तर ७२ दाखलपूर्व प्रकरणामध्ये २३ लाख ६० हजार तर न्या. राठोड यांच्यासमोर न्यायप्रविष्ठ ३३ प्रकरणांमध्ये तडजोड होवून २१ लाख ५० हजार रुपयाच्या वसूलीचे निकाल झाले. तीनही पॅनेलद्वारे दाखल व दाखलपूर्व अशा १२८ प्रकरणामध्ये १ कोटी १६ हजाराच्या वसूलीचे निकाल झाले.
या लोकअदालतीसाठी अ‍ॅड. शीतल साळवी, अ‍ॅड. आदिती बापट, अ‍ॅड. नुसरत पाटील-इनामदार, सहायक अधीक्षक संजय साळुंखे, अजित पाटील, अस्मिता डांगे, राजू पाटील, प्रदीप पाटील, रवींद्र घायतडक, आनंदा वणीरे, एस. एस. उंडाळे, तानाजी पाटील, विनोद भिलारे, पी. जी. मेटकुप्पी, शीतल केर्लीकर, भास्कर पाटील, अमित रेडकर, संदीप काकडे आदींचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT