कोल्हापूर

संध्यामठ , खंडोबा चे विजय

CD

82554
कोल्हापूर : शाहू छत्रपती के. एस. ए. लीग साखळी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा विरुद्ध प्रॅक्टिस यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘खंडोबा’कडून ‘प्रॅक्टिस’ पराभूत
‘संध्यामठ’चा वाघाची तालीमवर विजय
कोल्हापूर, ता. १३ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर २ - १ गोल फरकाने विजय मिळवला. अन्य सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर १ - ० ने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
खंडोबा विरुद्ध प्रॅक्टिस यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. आक्रमक चाली करत दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. यात सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सागर चिले याने मैदानी गोल करत सामन्यात १ - ० अशी आघाडी घेतली. या नंतर ‘खंडोबा’च्या अगदी फळीने अधिक आक्रमक खेळ केला. यात यश आले. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला अजीज मोमीनच्या पासवर श्रीधर परब याने गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. यानंतर दिग्विजय असनेकर याने २२ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामन्यात २ - १ अशी आघाडी घेतली. पूर्णवेळ हिच आघाडी कायम राहत खंडोबा संघाने सामना जिंकला.
संध्यामठ विरुद्ध उत्तरेश्‍वर यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. पहिल्याच मिनिटाला उत्तरेश्‍वरच्या प्रतीक कांबळे याला लागून चेंडू गोलजाळीत विसावल्याने स्वयंगोल झाला. याचा फटका संघाला बसला. उर्वरित सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या. यात उत्तरेश्‍वर संघाच्या खेळाडूंनी सामना बरोबरीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. अखेर पूर्ण वेळेत झालेल्या एकमेव गोलमुळे संध्यामठ संघ विजयी ठरला.
---------
चौकट
रॉकेट मैदानात
अतिउत्साही समर्थकांच्या प्रतापामुळे मैदानावर खेळाडू, पंच व अन्य जायबंदी होता होता राहिले. प्रेक्षक गॅलरीमधून सोडलेले रॉकेट थेट मैदानात येऊन आदळले. यातील एक रॉकेट खेळाडू व पंचांच्या मधोमध पडून मैदानात घुसले. दुसरे रॉकेट गोल जाळीच्या मागे पडले, तर अन्य रॉकेट मैदानाच्या इतरत्र पडले. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा या उत्साही समर्थकांच्या वर्तणुकीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे या कृतीतून दिसून आले.
----------
बुधवारचे सामने
दुपारी २ रंकाळा तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ
संध्याकाळी ४ जुना बुधवार पेठ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ
(मंगळवारी (ता. १४) सामने होणार नाहीत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT