कोल्हापूर

कोल्हापूर गोकाक कनेक्शन आज उघड होणार

CD

गोकाकमधील खून प्रकरणाचे
कोल्हापूर कनेक्शन उघड होणार
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापुरात गावठी पिस्तूलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांपैकी एकाचा थेट गोकाकमधील खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे धागेदोरे कोल्हापुरातील पोलिसांना मिळाले आहेत. उद्याच त्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्याचेही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, गावठी पिस्तूलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आणखी एक संशयित बेपत्ता असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तो, गोकाकचा असल्यामुळे त्याच्यावरही संशयाची सुई फिरण्याची शक्यता आहे. तो किंवा त्याच्याशी संबंधित कोणी गोकाकमध्ये गावठी पिस्तुलाचा वापर केला आहे काय, याचा तपास अंतिम टप्प्‍यात आहे. त्यामुळे गोकाकमधील खून कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
एक व्यक्ती बेपत्ता असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित कोल्हापुरातील आहे काय याचा शोध सुरू केला होता. त्या दरम्यान आंबेवाडी रोडवर गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या तिघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच त्यापैकी आणखी एक संशयित गोकाकचा असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्यांकडून पिस्तूल जप्त केली आहे. त्यांचा वापर गोकाकमध्ये झाल्याची माहिती पुढे आली. त्याचा आणि गोकाकमधील कोणत्या खुनाचा काही संबंध आहे काय याचा तपास पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत आहेत.
गोकाकमधील पोलिसांना तेथील बेपत्ता व्यक्तीच्या तपासासाठी मदत केली आहे. तेथील एकाच्या खुनाचा मुख्य संशयित आरोपीजवळ आम्ही पोहोचलो आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. याबाबतची माहिती उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्रानेच एकाचा खून केल्याचे संदर्भ असल्याचेही निरीक्षक वाघमोडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT