कोल्हापूर

बाजार समिती

CD

बाजार समिती मतदार यादी
सुधारित करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची मतदार म्हणून नावे समाविष्ट करून मतदार यादी दुरुस्ती करून जिल्हा निवडणूक प्राधिकरणास सादर करावी, असे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी बाजार समितीला दिले आहेत. त्यानुसार याद्यांमध्ये नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचाही मतदार म्हणून समावेश होणार आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्था पदाधिकारी, अडते, व्यापारी, माथाडी यांचा मतदार म्हणून समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार बाजार समितीने तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य असलेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली. यानंतर काही काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. मतदार यादीत ज्यांची नावे होती, यातील काही सदस्य पराभूत झाले, तर काही नवे सदस्य निवडून आले. यात नव्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट नव्हती. त्यामुळे असे सदस्य मतदार म्हणून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली. यावर राज्यभरातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. यात न्यायालयाने बाजार समिती निवडणुकीस मुदतवाढ दिली. त्यामुळे या मुदतवाढीच्या काळात नव्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार म्हणून समाविष्ट करावीत, तसेच जे सदस्य ग्रामपंचायत निवडणूक पराभूत झाले. त्यांची नावे कमी करावीत, अशी सुधारित मतदार यादी बनवून जिल्हा निवडणूक प्राधिकरणाकडे द्यावीत, असे या आदेशात म्हटले आहे. यासोबत विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या सदस्यांची नावेही समाविष्ट होणार आहेत.

...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT