कोल्हापूर

शेट्टी पत्रकार परिषद

CD

‘स्वाभिमानी’चा २२ फेब्रुवारीला चक्काजाम

राजू शेट्टी ः ऊस वाहतूकदारांची फसवणूक, प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदान रखडल्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ ः ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान, यासह विविध प्रश्‍ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवारी (ता. २२) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, बारावीच्या परीक्षा असल्याने हे आंदोलन दुपारी बारा वाजता होईल, त्यात राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन होणार नाही. तालुक्याच्या पातळीवरील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील, अशी माहिती श्री. शेट्टी यांनी दिली.
शेट्टी म्हणाले, ‘ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न जटिल बनला आहे. राज्यात ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे; पण तोडणी मजुरांची संख्या मात्र कमी होत आहे. याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यांतील ४४६ कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे.’
याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीज बिल दुरुस्त करून देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित ३७ टक्के वीज वाढ रद्द करावी, आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
.............
स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना
राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. या संघटनेमार्फत ऊस तोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करून कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी, टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
.....
आमच्याकडेही तणनाशक आहे
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असले तरी आमच्याकडेही तणनाशक आहे. त्यावर ‘कमळ’ टिकणार नाही, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT