कोल्हापूर

हद्दवाढीबाबत बैठक

CD

हद्दवाढीबाबत समर्थक, विरोधकांसोबत
आज पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक
कोल्हापूर, ता. १६ : गेल्या डिसेंबरपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर उद्या (ता. १७) पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हद्दवाढीबाबत बैठक बोलवली आहे. त्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समिती, विरोधी कृती समितीबरोबरच आमदार, क्रिडाई, माजी महापौर आदी विविध घटकांना निमंत्रित केले आहे.
रविवारी (ता. १९) मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर ही बैठक घेतली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुपारी साडेचार वाजता बैठकीचे नियोजन केले आहे. त्यात विरोधकांनाही बोलवले असून आमदार, माजी आमदार, माजी महापौर, क्रिडाई यांनाही निमंत्रित केले आहे. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीतर्फे हद्दवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतला. दोनदा चर्चा झाली पण निर्णय झालेला नाही. त्याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचीही भेट घेतली. त्यांनी अभ्यास करून महिन्यात बैठक घेतो, असे सांगितले होते. मात्र, आजतागायत बैठक झाली नसल्याने समितीने आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शुक्रवारी बैठक घेणार असल्याचे सांगितले असून कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT