कोल्हापूर

सोने तीन हजारांनी उतरले

CD

सोने तीन, तर चांदी पाच हजारांनी उतरली

ग्राहकांना दिलासा ः डॉलरचा दर कमी झाल्याचा परिणाम

कोल्हापूर, ता. १७ ः जागतिक पातळीवर सोने डॉलरचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे आज सोने प्रतितोळा तीन हजार, तर चांदी प्रतिकिलो पाच हजार रुपयांनी उतरली आहे. दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जीएसटी सोडून सोने प्रति तोळा ५९ हजार रुपये, तर चांदी प्रतिकिलो ७० हजार रुपयांवर पोहोचली. अचानक दर वाढल्याने सोने-चांदी खरेदीसाठीची ग्राहकांची पावले थांबली. मात्र, सोने डॉलरचा दर १९५० रुपयांवरून १८२५ रुपयांवर आला. त्याचा परिणाम सोन्याचे दर कमी झाले आहेत. आता सोने प्रतितोळा ५६ हजार १०० रुपये, तर चांदी प्रतिकिलो ६४ हजार ७०० रुपये झाली आहे. याबाबत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, ‘सोन्याच्या डॉलरचे दर कमी झाल्याने सोने आणि चांदीचे दर उतरले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामध्ये सोने, चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्यासह खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Faction : शरद पवार गटाच्या खासदारांना व्हिप जारी, लोकसभा कामकाजात हजर राहण्यासाठी तीन ओळींच्या पत्रात; अमोल कोल्हेंचे निर्देश

Pune Crime: मंचर पोलीस ठाण्यात १४ जणांचा गोंधळ; आरडाओरडा, शिवीगाळ आणि पोलिसांच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल

UP Urdu Academy: UP उर्दू अकादमीच्या चेअरमनपदी चौधरी कैफुल वरा अंसारी यांची पुन्हा नियुक्ती; नवी कार्यकारिणी जाहीर

2027 सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढा 'या' 5 वस्तू; अन्यथा वर्षभर सहन करावी लागेल पैशांची चणचण!

Latest Marathi News Live Update : काँग्रेस अलर्ट मोडवर, सर्व खासदारांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT