कोल्हापूर

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात सातत्य गरजेचे : डॉ. मुदगल

CD

83552
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातर्फे संशोधन व प्रशिक्षण मोहिमेच्या (कोर्ट) उद्‍घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात
सातत्य गरजेचे : डॉ. मुदगल
---
डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘कोर्ट-२०२३’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : आरोग्यसेवेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन गरजेचे आहे, असे मत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी ‘कोर्ट’चे आयोजन केले जाते. कुलगुरू डॉ. मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उपक्रमाचे उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. मुदगल म्हणाले, ‘‘आरोग्य सेवेतील समस्या ओळखून त्यावर योग्य उपाय शोधून काढण्यासाठी संशोधन महत्त्वाचे आहे. रुग्‍णालयात दाखल होणारा रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी कसा करता येईल, यासाठी संशोधन व्हावे.’’
या वेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मनीषा बिजापूरकर, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कोर्ट-२०२३ चे सचिव डॉ. बी. सी. पाटील, पृथ्वीराज पी. जी. क्लबचे सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
------------------
चौकट
विद्यार्थ्यांकडून संशोधन प्रकल्प सादर
या ‘कोर्ट’मध्ये मेडिकलचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे प्रथम वर्षाचे ७२, द्वितीय वर्षाचे ८१, तर नर्सिंगच्या १६ विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर केले. त्यातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्‍वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT