कोल्हापूर

दि. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानदानाची शतकोत्तरी परंपरा

CD

दि. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या
ज्ञानदानाची शतकोत्तरी परंपरा
लीड
देशामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राष्ट्रीय दृष्टिकोनातील आधुनिक शिक्षण देण्यासाठी काही संस्था उभ्या राहिल्या. १ फेब्रुवारी १९२१ मध्ये कोल्हापुरात एस. एस. श्रीखंडे, जी. बी. वाडीकर, एम. डी. जोशी, श्री खेबुडकर, नवरेशास्त्री यांनी दि. न्यू एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बिंदू चौकातील भुसारीवाड्यात संस्थेची आद्यशाळा ‘दि न्यू हायस्कूल’ सुरू झाले. शिक्षणाच्या या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाची सांगता आज होत आहे. या निमित्त...
- प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि न्यू एज्युकेशन सोसायटी
--------------
सध्या संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये २२ शाळा सुरू आहेत. यामध्ये सुमारे २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ७०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी येथे सेवा देत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणि गुणवत्ता पूर्ण अध्यापनामुळे संस्थेने शिक्षण क्षेत्रात आढळ स्थान निर्माण केले आहे.
मदनमोहन बी. लोहिया हे १९५१ ते १९९४ या प्रदीर्घकाळात संस्थेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी खऱ्या अर्थाने संस्थान नावारूपाला आणली. संस्थेचे आत्तापर्यंत झालेले सर्वच अध्यक्ष, सेक्रेटरी यांनी सस्थेचा आलेख चढता ठेवला. सध्या संस्थेची धुरा निर्मल लोहिया अध्यक्ष म्हणून सांभाळत आहेत. उपाध्यक्ष नितीन वाडीकर, नेमचंद संघवी, पद्माकर सप्रे, वसंत पाटील, संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष अनिल लोहिया, विश्‍वस्त मंडळाचे सदस्य, रवी गोएंका, यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य स्कूल कमिटीचे चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगती करत आहे.
संस्थेच्या शतकी वाटचालीत संस्थेच्या विविध शाळांतून साहित्य, कला, क्रीडा, उद्योग व वैद्यकीय क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी यशोशिखर गाठले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विं. दा. करंदीकर हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. याबरोबरच सकाळ माध्यम समूहाचे संपादक- संचालक श्रीराम पवार, कॅप्टन नानिवडेकर, रमेश मंत्री, नरेंद्र सिनकर, सरोजिनी बाबर, रवींद्र मेस्त्री, उद्योगपती जयकुमार पाठारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मध्यप्रदेश पोलिस डी.आय.जी निरंजन वायंगणकर, दिग्दर्शक यशवंत भालकर, प्रसिद्ध अभिनेता ऋषिकेश जोशी, गायक विनोद डिग्रजकर, डॉ. धनंजय गुंडे, रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रेसिडेंट वसंत पाटील हे देखील संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
संस्थेच्या सर्व शाळांचा निकाल ९८ ते १०० टक्क्यांपर्यंत लागतो. याशिवाय संस्थेतील विद्यार्थ्यांनी कला क्रीडा क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आजपर्यंत संस्थेतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. या शिवाय अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवली आहेत. यामध्ये संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. संस्थेने नुकतीच स्वर्गीय लतादेवी अनिल लोहिया स्पोर्टस्‌ ॲकॅडमी सुरू केली आहे. विनोद कुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मदन मोहन लोह या सांस्कृतिक मंचेची स्थापना केली. संस्थेतर्फे आयोजित संगीतमहोत्सवात दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली. संस्थेच्या सर्व शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यार्थी घडवण्याचे कार्य गेली शंभर वर्षे संस्था करत आहे. संस्थेचा हा ज्ञान यज्ञ अखंडपणे सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT