कोल्हापूर

पत्रकार परिषद

CD

कोल्हापूरमध्ये दहा मार्चपासून
‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’
मालोजीराजे छत्रपती; पोलो मैदानावर आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : कोल्हापूर इक्वेस्टिरियम असोसिएशनतर्फे दहा ते बारा मार्च दरम्यान ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ होत आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर त्याचे आयोजन केले आहे. सकाळी आठ ते बारा व दुपारी तीन ते सहा या वेळेत शो होईल.
मालोजीराजे म्हणाले, ‘‘हॉर्स शो २०१८ व २०१९ ला झाला. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांत त्याचे आयोजन करता आले नाही. यात पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील स्पर्धकांचा यात समावेश असून, थरोब्रीड, काठेवाड, मारवर, भीमातळी जिप्सी व वार्मब्लड जातीचे घोडे पाहायला मिळणार आहेत. इक्वेस्टिरियम खेळात शो जम्पिंग, ड्रसाज, जिमखाना गेम व ऐतिहासिक टेंट पेगिंगचे प्रदर्शन केले जाणार आहे.
२०१८ ला झालेल्या शोमध्ये दहा हजारांहून अधिक, तर २०१९ ला पंधरा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी शो पाहण्यास गर्दी केली होती. तसेच २०१८ च्या शोमध्ये राज्यस्तरावर ११० सेंटिमीटर, तर २०१९ ला १२५ सेंटिमीटर जंपचे रेकॉर्ड झाले आहे. सर्वसामान्य लोकांना खेळाची माहिती व्हावी, मुलांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेता यावे, या उद्देशाने शोचे आयोजन केले आहे. हा शो सर्वांसाठी खुला असणार आहे. ऑलिंपिकमध्ये या खेळाचा समावेश आहे.’’ पत्रकार परिषदेस असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र घाटगे, अच्युत करांडे, एबल फिलीप, जैद मुजावर, श्रेया घाटगे, कृतिका कारंडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT