कोल्हापूर

इचलकरंजी बसस्थानकाचे नामकरण

CD

ich191.jpg
83743
इचलकरंजी ः श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक नामकरणप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्‍थित होते.
----------
इचलकरंजी बस स्थानकाचे नामकरण
आमदार प्रकाश आवाडे, विकास खारगे यांची उपस्थिती
इचलकरंजी, ता. १९ ः वाद्यांचा गजर, छत्रपती शिवरायांचा जयजयकार आणि मुलींच्या लेझीम पथकाने धरलेला ठेका अशा उत्साहपूर्ण वातावरणात येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे ‘श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक’ असा नामकरण केले.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते हा कार्यक्रम झाला. साखर-पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक नामकरण करण्यासंदर्भात आमदार आवाडे यांच्यासह शिवप्रेमींनी विविध मार्गांनी आंदोलन केले होते. त्यानंतर शासन पातळीवर नामकरणाचा निर्णय घेतला. शिवजयंतीचे औचित्य साधत आज बस स्थानकात नामकरणाचा डिजिटल फलक लावला. या वेळी फित कापून व श्रीफळ वाढवून नामकरण सोहळा झाला. छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष केला. येथील शिवतीर्थ हे आता राज्यभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान बनले आहे. येथे येणारा प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही. शिवतीर्थ परिसराचे नाव आता मध्यवर्ती बस स्थानकाला दिल्यामुळे आनंद होत आहे. नामकरणप्रश्नी आंदोलनाबाबत दाखल असलेले शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
इचलकरंजीचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘आम्ही इचलकरंजीकर’ या माध्यमातून आम्ही सर्व अधिकारी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही खारगे यांनी दिली. आगार व्यवस्थापक वरिष्ठ संतोष बोगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अपर तहसीलदार शरद पाटील, रवींद्र माने आदी उपस्‍थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT