कोल्हापूर

पथनाट्य स्पर्धेत नाथ पै प्रशाला प्रथम

CD

GAD204.JPG
84045
गडहिंग्जलज : पालिकेतर्फे झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले. यावेळी स्वरुप खारगे, शिवाजी पाटील, अनिल गंदमवाड, धनंजय चव्हाण, श्‍वेता सुर्वे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------
पथनाट्य स्पर्धेत नाथ पै प्रशाला प्रथम
पालिकेतर्फे विविध स्पर्धा : क्रिएटिव्ह द्वितीय, फुले विद्यालय तृतीय
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : येथील पालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. पथनाट्यमध्ये बॅ नाथ पै प्रशालेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. क्रिएटिव्ह हायस्कूलने द्वितीय तर सावित्रीबाई फुले विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.
इतर स्पर्धांचा निकाल असा : चित्रकला - आकांक्षा पाटील, संजय शिंदे, शिवम खानापुरे, ऑडीओ जिंगल : गुरुकूल अकॅडमी, गडहिंग्लज कला अकादमी, श्री डान्स अकादमी, व्हीडीओ लघुपट : गुरुकूल अकॅडमी, रसिका-राधिका प्रोडक्शन, रुपम मोकाशी, भिंतीचित्र काढणे : भाऊ कांबळे, रोशन केसरकर, प्रशांत कांबळे. विजेत्यांना मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्याहस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी राज्याच्या राज्यगीताचे सामुहीक गायन केले.
पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, मिळकत व्यवस्थापक रविनंदन जाधव, कार्यालय निरीक्षक श्‍वेता सुर्वे, करनिरीक्षक भारती पाटील, कनिष्ठ अभियंता निखिल पाटील, करनिरीक्षक अवंती पाटील, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, प्रा. शिवाजी पाटील, संतोष सोनटक्के आदी उपस्थित होते. माझी अभियानातंर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत विविध उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी या यामध्ये सहभाग घेवून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी खारगे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT