कोल्हापूर

खेळांतून ताणतणाव कमी होण्यास चालना

CD

84162
कोल्हापूर : जिल्‍हा परिषद क्रीडा स्‍पर्धांचे उद्‍घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपस्थित होते.

खेळांतून ताणतणाव कमी होण्यास चालना
पालकमंत्री केसरकर; जिल्‍हा परिषदेत क्रीडा स्‍पर्धांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २० : जिल्‍हा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र येण्याची संधी मिळत आहे. दैनंदिन कामकाजामधील ताणतणाव कमी होण्यास खेळामुळे चालना मिळते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्‍हा परिषद क्रीडा स्‍पर्धेचे उद्‍घाटन आज पोलिस मैदानात पालकमंत्री केसरकर यांच्या हस्‍ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच सर्व विभागाचे खातेप्रमुख, गट विकास अधिकारी तसेच विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या क्रीडा स्‍पर्धा २० ते २२ फेब्रुवारीअखेर होणार आहेत. पुढील दोन दिवसांत मैदानी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये दोन हजार ५०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात एक हजार ४०० पुरुष व एक हजार १०० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या स्पर्धामध्ये विजयी संघांना व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
-----------------
चौकट
मुख्यालयाचा संघ विजयी
सोमवारी (ता. २०) कबड्डीच्या स्‍पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये गगनबावडा विरुद्ध शाहूवाडी असा सामना झाला. यामध्ये शाहूवाडीच्या संघाने विजय मिळवला. शिरोळ विरुद्ध चंदगड सामन्यात शिरोळ विजयी झाले, तर मुख्यालय विरुद्ध पन्हाळा सामन्यात मुख्यालयाचा संघ विजयी झाला. कागल विरुद्ध आजरा सामन्यात कागलने विजय मिळवला. राधानगरी संघाला बाय मिळाला. गडहिंग्लज विरुद्ध भुदरगड या सामन्यात भुदरगड विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT