कोल्हापूर

बांबू प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची संधी

CD

ajr226.jpg
84644
आजरा ः येथील पंचायत समितीमध्ये बांबू प्रशिक्षण कार्यशाळा उद्‍घाटनप्रसंगी बोलताना तहसीलदार विकास अहिर. अविनाश पाटील, डी. डी. कोळी, के. के. उपाध्ये, एस. व्ही. हर्डीकर, ए. एच. जमादार, एस. बी. कांबळे उपस्थित होते.
----------------------
बांबू प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची संधी
तहसीलदार अहिर ः आजरा पंचायत समितीमध्ये बांबू प्रशिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २२ ः बांबूपासून कलाकुसर, शोभेच्या वस्तू यासह विविध वस्तूंची निर्मिती तयार करण्याचे उद्योग सुरू आहेत. केंद्र व राज्य शासनही याला प्रोत्साहन देत आहे. भविष्यात बांबू प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची मोठी संधी आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले.
आजरा पंचायत समिती सभागृहामध्ये आजपासून स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसीटी), कोल्हापूरअंतर्गत बांबू प्रशिक्षणाला सुरवात झाली. याचे उद्‍घाटन तहसीलदार अहिर यांच्या हस्ते झाले. सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, आरसीटीचे संचालक के. के. उपाध्ये, तज्ज्ञ मार्गदर्शक एस. व्ही. हर्डीकर, ए. एच. जमादार उपस्थित होते.
सहायक गटविकास अधिकारी पाटील म्हणाले, ‘आजरा तालुक्यात बांबूचे उत्पादन मोठे आहे. येथे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिला बचत गटांना एकत्रित करून बांबू क्लस्टर तयार केले जाईल. त्यांनी बनवलेल्या वस्तूची विक्रीसाठी बचत भवनची इमारत खुली करणार आहे.’ हर्डीकर म्हणाले, ‘महिला बचत गटांनी स्वावलंबन व स्वाभिमान शिकावा. विविध कौशल्य आत्मसात करून स्वतःचे व्यवसाय उभे करावेत. बांबू प्रक्रिया उद्योगातून हे शक्य आहे.’ नायब तहसीलदार श्री. कोळी, आरसीटीचे संचालक श्री. उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. महिला बचत गटाच्या ४० महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. तालुका अभियान कक्षाचे प्रभाग समन्वयक एस. बी. कांबळे यांनी स्वागत केले. बॅंक सखी आरती भादवणकर यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला कांबळे यांनी आभार मानले.
-------------
तेरा दिवसांची कार्यशाळा
आठ दिवस बांबू क्रॉप्टिंगचे कोअर ट्रेनिंग होईल. पाच दिवस सामान्य उद्योजकता विकास (एडीपी) अशी तेरा दिवसांची कार्यशाळा होईल. यासाठी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण कांबळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT