कोल्हापूर

कॉपीराईटवर कार्यशाळा

CD

84673
कसबा बावडा: उपस्थिताना मार्गदर्शन करताना ध्रुव ब्रह्मभट.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीत
पेटंट, कॉपीराईटवर कार्यशाळा
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बडोदा येथील ‘माय क्रेव कन्सल्टन्सी’च्या मार्गदर्शनाखाली पेटंट, कॉपीराईट, ट्रेड मार्कवर कार्यशाळा झाली. कार्यशाळेत माय क्रेव कन्सल्टन्सीचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव ब्रह्मभट, मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मेनन यांनी मार्गदर्शन केले. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्कचे दैनंदिन जीवनातील तसेच सेवाक्षेत्र, उच्च शिक्षणामध्ये सध्याच्या काळामधील महत्त्व सांगितले. भारताला भविष्यामध्ये बलशाली बनवण्यासाठी आपण याबाबतीत सरस होण्याचे आवाहन केले. तसेच पेटंट किंवा कॉपीराईट करणे हे किती सहज आणि सुलभ आहे, हे सांगितले. अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव, आय.पी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. गणेश पाटील, इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत जगताप, विभाग प्रमुख डॉ. किरण माने, अमित पाटील, प्रियांका पाटील यांच्या उपस्थित उद्‌घाटन झाले. अधिष्ठाता, विभाग प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्‍वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अधिष्ठाता प्रा. मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. वैभवी घारे, विद्यार्थी प्रतिनिधी विश्‍वनाथ चौगुले, अनिकेत जाधव, ओंकार गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT