कोल्हापूर

आजरा ः एक जण ठार

CD

84701
...

मोटारसायकल ओढ्यात
कोसळून एक जण ठार

आजरा - चंदगड रस्त्यावर दुर्घटना

आजरा, ता. २२ ः मोटारसायकल ओढ्यात कोसळून भावेवाडी (ता. आजरा) येथील शामराव कृष्णा गुडूळकर (वय ५२, रा. जेऊर, ता. आजरा) हे जागीच ठार झाले. म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील नातेवाईकांकडे ते यात्रेसाठी जात होते. आज दुपारी आजरा - चंदगड रस्त्यावर साडेतीन वाजता ही घटना घडली. आजरा पोलिसात नामदेव गुडुळकर यांनी वर्दी दिली आहे.
गुडूळकर हे जेऊर येथून मोटारसायकल क्रमांक (एमएच ०४ एक्यू १९७८) ने म्हाळुंगे (ता. चंदगड)कडे यात्रेसाठी निघाले होते. भावेवाडी येथील तीव्र उतारावर त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. मोटारसायकलसह ते पंधरा ते वीस फूट खोल ओढ्यात कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्री. गुडूळकर हे मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते गावी घर बांधण्यासाठी आले होते. गेले वर्षभर ते गावीच होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहीत मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT